Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेत दिलेल्या निकालानुसार एचएसआरपी बसविण्याचे निर्देश

marathinews24.com

बारामती – राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची निर्देश असून नागरिकांनी वाहनांना एचएसआरपी बसवून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – सविस्तर बातमी 

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेत दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याची तरतूद आहे. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत जुन्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे कामकाज गतीने सुरू आहे, याकामात अधिक गतीमानता येण्याकरीता विशेष उपाययोजना करण्याकरीता आयुक्तालयाच्यावतीने निर्देश देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जून्या परिवहन संवर्गातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, परवानाविषयक कामकाज व खाजगी संवर्गातील वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज वगळून वाहन हस्तांतरण, नोंदणी प्रमाणपत्रामध्ये पत्ता बदल करणे, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे, नाहरकत प्रमाणपत्र जारी करणे, वाहनांमध्ये बदल करणे आदी वाहनविषयक सर्व कामकाज एचएसआरपी बसविल्याशिवाय १६ जून २०२५ पासून करण्यात येणार नाही.

तथापि, वाहन मालकांनी एचएसआरपी बसविण्यासाठी पूर्व नियोजित दिनांक व वेळ घेतली असल्यास त्या पावतीची खातरजमा करून त्यांच्या वाहनांचे कामकाज करण्यात येईल. १६ जून २०२५ पासून एचएसआरपी न बसवलेल्या वाहनांचे कामकाज करण्यात येणार नाही, असे बारामतीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×