भोसरी विधानसभा मतदार संघात पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

भोसरी विधानसभा मतदार संघात पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघात पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणीस प्रारंभ झाला असून, पात्र मतदारांनी ६ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा २०७-भोसरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत कार्यक्षेत्राचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी महेश सुधाळकर यांनी केले आहे.

प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणी टाळा – आरटीओकडून बस मालकांना आवाहन – सविस्तर बातमी 

या मतदार नोंदणीसाठी भोसरी विधानसभा मतदार संघात एकूण ११ मतदान केंद्रे आहेत. मतदार नोंदणीसाठी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर क्र. १८, चिखली प्राधिकरण, पुणे येथे सुरु करण्यात आले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघासाठी सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून भोसरी, धानोरी, वडगाव शेरी, खराडी, मोशी, देहू, तळवडे तसेच वडमुखवाडी या क्षेत्रांसाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून हवेली पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी शिवाजी नागवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षक मतदार पात्रतेसाठी १ नोव्हेंबर २०२५ च्या अगोदरच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्षे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत माध्यमिक शाळेच्या दर्जाखाली नसलेल्या वर्गात अध्यापन केलेले शिक्षक मतदार नोंदणीस पात्र राहतील. पदवीधर मतदार पात्रतेसाठी १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत किमान तीन वर्षांपूर्वी भारतातील विद्यापीठातून पदवी किंवा पदवी समकक्ष शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेला आणि पुणे महसूल विभागातील सर्वसाधारण रहिवासी असलेला नागरिक मतदार नोंदणीस पात्र आहे.

पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. १८ आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. १९ या अर्ज नमुन्यांचा वापर करावा. मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार असल्याने यापूर्वीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार नाही, असेही सुधाळकर यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×