प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणी टाळा – आरटीओकडून बस मालकांना आवाहन

जादा भाडे आकारणीच्या अनुषंगाने तक्रार नोंदविण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – सणासुदीच्या व गर्दीच्या काळात प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे पाहता सर्व बस ओनर, चालक व मालक यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिकीट दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारू नये, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

नवकार आर्ट फाऊंडेशनतर्फे चित्रप्रदर्शनाचे आयोजन – सविस्तर बातमी

सणासुदीच्या व गर्दीच्या काळात काही बस मालक (ओनर) प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने, या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील सर्व बस ओनर असोसिएशन यांची प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दिनांक नुकतीच बैठक घेण्यात आली होती.

बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड सुरेश आव्हाड, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी युवराज पाटील तसेच बस ओनर असोसिएशनच्यावतीने २८ प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिमी भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या बस ओनर यांच्या प्रवासी बसेसविरुद्ध दीपावली कालावधीत मोटार वाहन कायदा १९८८ व नियमांनुसार कडक मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर करु नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन धोकादायक पद्धतीने उभे करू नये, तसेच वाहन सुस्थितीत असून त्याची सर्व कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी, अन्यथा दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागू शकते. असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांनी जादा भाडेदर आकारणी किंवा प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी असल्यास आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व तिकीटाच्या फोटोसह व्हॉट्सअप क्रमांक ८२७५३३०१०१ किंवा ई-मेल rto.12-mh@gov.in या माध्यमातून तक्रार नोंदवावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×