कलाकारांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी नवकार आर्ट फाऊंडेशनतर्फे भव्य चित्रप्रदर्शन
marathinews24.com
पुणे – नवकार आर्ट फाऊंडेशनतर्फे महाराष्ट्रातील जैन समाजातील 40 चित्रकारांनी रेखाटलेल्या 90 चित्रांचे प्रदर्शन दि. 12 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 12 रोजी सकाळी 10:30 वाजता कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, सुरेश लोणकर, सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, सूर्यदत्ता इन्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, बाळासाहेब धोका, संदीप भंडारी, विजय मारलेचा, राजश्री पारख, ज्येष्ठ पत्रकार सुनिल माळी उपस्थित राहणार आहेत.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘पुणे चॅरिटी क्रिकेट लीग’ संपन्न – सविस्तर बातमी
महाराष्ट्रातील 60 चित्रकारांच्या 200 चित्रांमधून 90 चित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनात 23 महिला, 7 पुरुष आणि 10 बाल कलाकारांच्या चित्रांचा समावेश आहे. कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. प्रदर्शनात सहभागी चित्रकारांचा पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.





















