Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

प्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्त

आरोपीला अटक, चतुःशृंगी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – प्रतिबंधित तंबाखुजन्य गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करणार्‍या आरोपीला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल १३ लाख ५१ हजारांचा तंबाखूजन्य साठा, टेम्पो असा मिळून १९ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमर नंदु पन्हाळकर (वय ३७ रा.१०१ जनवाडी जनता वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी – सविस्तर बातमी

चतुःशृंगी पोलीस २७ एप्रिलला पेट्रोलिंग करीत असताना, गोखलेनगर परिसरात एकाने तंबाखूजन्य पदार्थांचा साठा केल्याची माहिती मिळाली. पथकाने जनवाडीतील जनता वसाहतमध्ये धाव घेत आरोपी अमर पन्हाळकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १३ लाख ५१ हजारांचा पानमसाला व तंबाखूजन्य साठा जप्त केला आहे. आरोपीने हे तंबाखूजन्य पदार्थ कोणाकडून घेतले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, पोलीस निरीक्षक आश्विनी ननावरे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, इरफान मोमीन, बाबुलाल तांदळे, श्रीकांत वाघवले, शिर्वेâ यांनी केली. एपीआय अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×