Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमी

मध्यवर्ती अभिनव चौकात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रॅव्हल्स चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोन महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकिृती स्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा अपघात गुरूवारी ( दि.३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास मध्यवर्ती अभिनव चौकात घडला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

पुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रॅव्हल्स चालक किरण कचरे हा गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास स्वारगेटहून अभिनव चौकातून पुढे जात होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. ट्रॅव्हल्स वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या. अपघातात जखमी महिलांच्या डोक्याला व पायाला मार लागला आहे. अपघाताच्या आवाजामुळे आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांसह सकाळच्या सत्रात व्यायामासाठी बाहेर आलेल्या नागरिकांनी धाव घेतली. त्यानंतर खडक पोलिसांसह नागरिकांनी जखमी महिलांना रूग्णालयात दाखल केले.

अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालक किरण कचरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, अपघातात अत्रे सभागृहाजवळील लोखंडी रेलिंगचे मोठे नुकसान झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×