Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

आयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्न

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

लग्नानंतर पत्नीला दिला त्रास, ५ जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आयटी कंपनीत ड्रायव्हर असतानाही स्वतःला मॅनेजर असल्याची बतावणी करीत एकाने तरुणीची फसवणूक करत लग्न केले. त्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना खराडीतील खांदवेनगर परिसरात २५ मे २०२५ ते एप्रिल २०२६ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी २६ वर्षीय विवाहित महिलेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळती – सविस्तर बातमी

दीपक दौलतराव मुरकुटे (रा. खांदवेनगर, खराडी), रेखा दौलतराव मुरकुटे (रा. देवकर, ता. लातूर), राहुल दौलतराव मुरकुटे (रा. कर्वेनगर), कल्पना पिंटू मुंढे (रा. अरबुजवाडी, परभणी) आणि अमृता आनंद शेटे (रा. संघर्ष चौक, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मुरकुटे याने स्वतः आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचे खोटे सांगून फिर्यादी महिलेशी मे २०२५ मध्ये लग्न केले. प्रत्यक्षात तो ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर आरोपींनी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करत क्रूर वागणूक दिली. सततच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. आंबेगाव पोलिसांनी संबंधित पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×