Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडक

भरधाव वाहनाच्या धडके १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, चालक फरार

मद्यधुंद चालकाविरोधात गुन्हा

marathinews24.com

पुणे – शहरातील धनकवडी परिसरात बेदरकारपणे कार चालकाने पायी चाललेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातात दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मद्यधुंद चालकाविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्या दत्तात्रय पिलाने ( वय १७) आणि रितू चंद्रकांत हासूरे ( वय १७) अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत.

प्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्त – सविस्तर बातमी

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्या दत्तात्रय पिलाने ( वय १७) आणि रितू चंद्रकांत हासूरे ( वय १७) या दोघी २९ एप्रिलला सायंकाळी पावणे नऊ वाजता बालाजीनगर येथील पवार हॉस्पिटलसमोरून गणेश मंदिराकडे पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एमएच १२ डीई ०११२ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने अचानक जोरदार धडक दिली.

या धडकेत दोघी रस्त्यावर पडल्या. आर्या पिलाने हिला डोक्याला, कानाला, कमरेला आणि पाठीला मार लागला. तर रितू हासूरे हिलाही डोक्याला दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करून दोघींना रुग्णालयात दाखल केले.

कार चालक अकबर तांबोळी ( ३०, रा. धनकवडी) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप जखमींनी केला आहे. अपघातावेळी त्याच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच, या चालकाने यापूर्वीही एलोरा पॅलेस परिसरात दोन ते तीन जणांना धडक देऊन जखमी केल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्याचेही सांगण्यात आले. अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी त्यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी संबंधित चालकाविरोधात बेदरकार वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे आणि निष्काळजीपणामुळे दुखापत केल्याचे कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार आरोपीच्या भावाने कार कर्जावर घेतली आहे. हप्ते थकल्याने बँकेचे वसूली एजंट कार नेण्यासाठी आले होते. त्यांनी ती नेऊ नये म्हणून आरोपी ती घेऊन जाण्याचा प्रयत्नात अपघात झाला

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×