Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

कोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरी

कोरियन भाषा, संस्कृती व इतिहासावर आधारित जागतिक स्पर्धा; विजेत्यास अंतिम फेरीसाठी दक्षिण कोरियात जाण्याची संधी

marathinews24.com

पुणे – कोरिया प्रजासत्ताकाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासातर्फे ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ या जागतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालय आणि कोरियन ब्रॉडकास्टिंग सिस्टम (केबीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पुण्यातील किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती कोरियाचे मुंबईतील उपवाणिज्यदूत क्येओंगबेओम किम आणि किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउंजू लिम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

क्येओंगबेओम किम म्हणाले, “भारतासाठीची प्राथमिक फेरी २८ जून २०२६ रोजी पुण्यातील किंग सेजोंग इन्स्टिट्यूट येथे होणार आहे. या स्पर्धेद्वारे सहभागी विद्यार्थ्यांना कोरियाची भाषा, संस्कृती, इतिहास आणि समाज याबाबतचे ज्ञान सादर करण्याची संधी मिळणार असून, कोरियाबद्दलची आवड वाढविण्याचा उद्देश आहे. ‘क्विझ ऑन कोरिया’ हा दक्षिण कोरिया सरकारचा प्रमुख सांस्कृतिक उपक्रम आहे. जगभरातील कोरियन दूतावासांमार्फत प्राथमिक फेऱ्या घेतल्या जातात आणि प्रत्येक देशातून एक विजेता अंतिम फेरीसाठी कोरियात सहभागी होतो.”

पुण्यातील प्राथमिक फेरीतील विजेता भारताचे प्रतिनिधित्व अंतिम फेरीत करणार असून, अंतिम फेरीतील स्पर्धकांना कोरियन संस्कृतीचा अनुभव घेण्यासह तेथील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यातही सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी @s.korea.in.mumbai या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी mumbai@mofa.go.kr या ई-मेलवर किंवा ९८२०२७२७९१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे डॉ. एउंजू लिम यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×