Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

६५० हून अधिक गोशाळांना भेटी; गोपालकांशी थेट संवादातून प्रश्न सोडवण्यावर भर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या कामकाजाला विशेष गती प्राप्त झाली आहे. राज्यातील ६५० हून अधिक गोशाळांना भेटी देऊन तसेच १००० पेक्षा अधिक गोपालक, शेतकरी व संबंधित संस्थांशी संवाद साधत विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सन २०२५-२६ या वर्षासाठी देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रती गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे.

कोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरी – सविस्तर बातमी

‘सेव्ह द काऊ’ उपक्रमांतर्गत ५,५०० हून अधिक गाईंचे संरक्षण करण्यात आले आहे. तसेच सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोमयापासून तयार करण्यात येणारे दिवे, मूर्ती, साबण यांसारख्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येत आहे. याशिवाय, गोमय उत्पादने, ई-गोकट्टा उपक्रम, अधिकृत संकेतस्थळ यांसारख्या माध्यमांतून गोसंरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून आयोगाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात आले आहे. राज्यातील गोवंश संरक्षणासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×