Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

दुचाकी एन बी मालिकेतील आकर्षक नंबरसाठी अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

एन बी मालिकेतील आकर्षक क्रमांकांसाठी 20 व 21 जानेवारीला अर्ज स्वीकृती, लिलावाची तारीख जाहीर

marathinews24.com

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी–चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एन बी ही नवीन मालिका लवकरच सुरू होत आहे. आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक चारचाकी वाहनांसाठी तीनपट शुल्क भरून राखीव ठेवण्यासाठी अर्ज 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारले जातील. दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांकाकरिता अर्ज 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारले जातील.

नरेगाच्या कामासाठी ७० हजाराची लाच घेणारा सरपंच जाळ्यात – सविस्तर बातमी

चारचाकीची यादी 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी 21 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दोष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

तसेच दुचाकीची यादी 22 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कक्षात नोंदणी प्राधिकारी यांचे उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

अर्जासोबत डीडी, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅनकार्ड व आधारकार्ड-लिंक मोबाईल क्रमांकाच्या साक्षांकित प्रती आवश्यक असून डीडी “DY RTO, Pimpri-Chinchwad” या नावाने राष्ट्रीय, अनुसूचित बँकेचा असावा. एकदा राखून ठेवलेला राखीव क्रमांक बदलता येणार नाही. राखीव क्रमांकानंतर 180 दिवसांत वाहन नोंदणी न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×