Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

क्रिकेटपटू हार्दीक पांड्याच्‍या विरोधातील अर्ज अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग

क्रिकेटपटू हार्दीक पांड्याच्‍या विरोधातील अर्ज अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज केला होता दाखल

marathinews24.com

पुणे – भारतीय क्रिकेट संघातील अष्ठपैलु खेळाडू हार्दीक पांड्या विरोधातील तक्रार अर्जाची पुढील चौकशी संबंधित अधिकार क्षेत्रानुसार गुजरात येथील अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारदार वाजेद खान (बीडकर) समजपत्र देत माहिती दिली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

महावितरणचा आयपीओ येणार ; कृषी वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी – सविस्तर बातमी 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेटपटू हार्दिक हिमांशू पांड्या (रा. खर पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात अर्ज शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्राप्त झाला होता. अर्जाचे अवलोकन केल्यानंतर संबंधित घटना ही अहमदाबाद (गुजरात) येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर ८ मार्च २०२६ रोजी घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार हा अहमदाबाद पोलिसांकडे येत असल्याने, शिवाजीनगर पोलिसांनी हा तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त, अहमदाबाद यांच्याकडे वर्ग केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वकप जिंकल्‍यानंतर देशभरात जल्‍लोषाचे वातावरण असतानाच अष्ठपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा देखील आनंद व्यक्‍त करत होता. त्‍याने यावेळी आपल्‍या प्रेयसीसोबत मैदानवर आनंद व्यक्‍त करताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्‍याचा तक्रारअर्ज पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ॲड. वादेश खान यांच्‍या वतीने दाखल करण्यात आला होता. तोच अर्ज आता गुजरात पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×