Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

ऑनलाईन अर्ज करण्यास 27 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेतंर्गत वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 27 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बालगंधर्व परिवार ट्रस्ट, महाराष्ट्रच्या वतीने पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी, अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच अन्य योजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये https://hmas.mahalt.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावयाचे आहेत.

सुधारित शासकीय वसतीगृहाचे सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे. प्रवेश अर्ज ऑनलाईनरित्या 27 ऑगस्ट पर्यंत करावयाचे आहेत. अर्जांची छाननी 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अंतिम करून 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 12 सप्टेंबर अशी राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2025 अशी राहील, असे इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे सहायक संचालक प्रदिप संकपाळ यांनी यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×