Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हॉर्नचा जाब विचारला; बुलेट चालकाने ज्येष्ठाला केली बेदम मारहाण

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

बुलेट चालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या अवाराात बुलेटचा कर्णकर्कश हाॅर्न वाजविल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट,, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना स्वारगेटमधील महर्षीनगर भागात घडली. याप्रकरणी बुलेट चालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुलेट चालकासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.

शाळकरी मुलीवर बलात्कार; एकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे महर्षीनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी बुलेट चालक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सोसायटीच्या आवारात आला. त्याने जोरात बुलेटचा हाॅर्न वाजविला. बुलेटचा कर्णकर्कश हाॅर्नमुळे त्रासलेल्या ज्येष्ठाने विचारणा केल्यानंतर बुलेट चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बुलेट चालक आणि साथीदार सोसायटीच्या आवारात आले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्क्या, तसेच बॅटने मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

बुलेटला बसविण्यात आलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा कर्णकर्कश हाॅर्न वाजविणाऱ्या १५० बुलेट चालकांविरुद्ध पोलिसंनी नुकतीच कारवाई केली. बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यासाठी विशेष माेहिम राबविली. या माेहिमेत विरुद्ध दिशेने जाणरे दुचाकीस्वार, ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसंनी कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या होत्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×