Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शाळकरी मुलीवर बलात्कार; एकाविरुद्ध गुन्हा

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शाळेत सोडण्याची बतावणी करुन अल्पवयीन मुलीवर मोटारीत बलात्कार करण्याची धक्काायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीतील आहे. ज्ञानेश्वर सुरेश रायरीकर (वय २९, रा. पोळ काॅलनी, आपटे सोसायटी रस्ता, वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसरमध्ये महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा शाळकरी मुलीच्या ओळखीचा आहे. त्याची पीडित मुलीच्या आईशी ओळख होती. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे सातच्या सुमारास अल्पवयीन मुलीला मोटारीतून शाळेत सोडतो, असे सांगून तिला आरोपीने नेले. कर्वेनगर भागातील डीपी रस्त्यावर त्याने मोटार थांबविली. मोटारीत त्याने मुलीला धमकावून बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबतची माहिती आईला दिली. त्यानंतर आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक तरडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×