Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

पुण्यात ‘एटीएस’ची कारवाई

प्रार्थनेतून कर्करोग बरा करण्याचा दावा

कोंढाव्यातील मीठानगर भागात संशयितांच्या घरांवर छापे

marathinews24.com

पुणे – राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी (दि.९) सकाळी कोंढाव्यात छापे टाकली. मीठानगर भागातील संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. एटीएसच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी गुरुवारी सकाळपासून कोंढव्यातील मीठानगर परिसरात छापे टाकले. या कारवाईत एटीएसने संशयितांना ताब्यात घेतली, तसेच त्यांच्या घरातून काही कागदपत्रे, अन्य मुद्देमाल जप्त केला. कारवाई सुरू असताना मीठानगर भागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात; ८ विद्यार्थी जखमी – सविस्तर बातमी

पुण्यात २०२३ मध्ये पकडलेल्या ‘आयसीस’च्या दहशतवाद्यांनी मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाॅम्बस्फाेट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगलात त्यांनी बाॅम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बाॅम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघडकीस आले होते. मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (तिघेही रा. पडघा, ठाणे) यांना अटक केली होती.

मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले होते. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×