Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात सराफी पेढीवर दरोड्याचा प्रयत्न

पुण्यात सराफी पेढीवर दरोड्याचा प्रयत्न

एनडीए रस्त्यावरील घटना

marathinews24.com

पुणे – सराफी पेढीवर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना सराफ व्यावसायिक तरुणाने प्रतिकार केल्याने चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. झटापटीत सराफ व्यावसायिकाला किरकोळ दुखापत झाली असून, एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात नुकतीच ही घटना घडली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. चोरट्यांनी एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरातील आणखी एका सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

मेट्रोमनीवरील ओळख पडली महागात – सविस्तर बातमी 

सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. या घटनेत सराफ व्यावसायिकाला किरकोल दुखापत झाली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सराफ व्यावसायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. चोरटे सीसीटीव्ही चित्रीकणात आढळून आले आहेत’, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका गायकवाड यांनी दिली.

उत्तमनगरमघील एनडीए रस्त्यावर धावडे पेट्रोल पंपासमोर मोरया ज्वेलर्स सराफी पेढी आहे. गुरुवारी (२८ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास तक्रारदार सराफ व्यावसायिक पेढीत होते. त्यावेळी दुचाकीवरुन तीन चोरटे आले. खरेदीचा बहाणा करुन चोरटे पेढीत शिरले. चोरट्यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. सराफी पेढीतून दागिने लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

सराफ व्यावसायिकाने प्रसंगावधान राखून चोरट्यांना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. पेढीत सेल्फी स्टिक होती. सराफ व्यावसायिक तरुणाने चोरट्यांवर सेल्फी स्टिक उगारली. झटापटीत सराफी पेढीतील काऊंटरवर काच फुटल्याने सराफ व्यावसायिक तरुणाच्या हाताला दुखापत झाली. चोरट्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. तरुणाने चोरट्यांना प्रतिकार केल्याने चोरटे घाबरले. झटापटीत तरुणाच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. पकडले जाण्याची भीती वाटल्याने चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसंनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरटे दुचाकीवरुन खडकवासला धरणाच्या दिशेने पसार झाले.

चोरट्यांनी दुचाकीला असलेली वाहन क्रमांकाची पाटी काढून ठेवली होती. सहायक निरीक्षक प्रियांका गायकवाड तपास करत आहेत. एनडीए-वारजे रस्त्यावरील शिवणे परिसरात एका सराफी पेढीवर दरोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शनिवारी (२९ नोव्हेंबर) सायंकाळी घडली. सराफाने आरडा ओरडा केल्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. याबाबत एका सराफ व्यवासायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे परिसरात विजयलक्ष्मी ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुुचाकीवरुन आलेले तीन ते चार चोरटे खरेदीच्या बहाण्याने पेढीत शिरले. चोरट्यांनी शस्त्रे होती. एका चोरट्याने शस्त्र पेढीतील काचेवर आपटले. सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोके, कपाळाला दुखापत झाले. सराफ व्यावसायिकाचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेले दुकानदार तेथे जमा झाले. पकडले जाण्याची भीती वाटल्याने चोरटे सराफी पेढीसमोर लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×