Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत बालक-पालक मेळाव्यांद्वारे जनजागृती

योजनेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत होणार साजरा

marathinews24.com

पुणे – एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार असून यासाठी सहा महत्त्वपूर्ण विषय निश्चित करण्यात आलेले आहेत.

तीनचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकीसाठी राखून ठेवता येणार – सविस्तर बातमी

लठ्ठपणा नियंत्रण साखर व तेलाचे सेवन कमी करणे, प्रारंभिक बालसंगोपन व शिक्षण-पोषण भी पढ़ाई भी, एक पेड मा के नाम, बालक व लहान मुलांच्या आहार पद्धती, बाबा पालकांचा सहभाग, लोकल इज होकल. संकल्पनेनुसार जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि पोषण माह लोकचळवळीत रुपांतरित करण्यासाठी पुणे शहरातील आयसीडीएस प्रकल्पांतर्गत हे मेळावे अंगणवाडी केंद्रे, शाळा तसेच महापालिकेच्या सार्वजनिक बागांमध्ये घेण्यात येणार आहेत.

मेळाव्यात मुलांसाठी खेळांद्वारे मार्गदर्शन तर पालकांसाठी योग्य पालकत्त्व व बालसंगोपनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बाबा-पालकांचा सक्रिय सहभाग, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास, मेंदूचा विकास आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक सक्षम होतील.

पोषण महिना हा फक्त सरकारी कार्यक्रम न राहता प्रत्येक घराघरात रुजावा ही या मागील संकल्पना आहे. योग्य आहार, खेळ, प्रेमळ संवाद आणि संयुक्त संगोपन हीच मुलांच्या आनंदी व निरोगी भविष्यासाठी खरी पायाभरणी असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे, अशी माहिती मनीषा बिरारीस बाल विकास प्रकल्प अधिकारी पुणे उत्तर यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×