Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

वाघोलीतील बकोरी रस्त्याचा प्रश्न मार्गी

वाघोलीतील बकोरी रस्त्याचा प्रश्न मार्गी

विधानपरिषद डॉ. नीलम गो-हे यांची मध्यस्थी यशस्वी

marathinews24.com

पुणे – दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वाघोलीतील जैन वसतीगृह ते बकोरी रस्त्याच्या विकसनाच्या प्रश्नामध्ये अखेर तोडगा निघाला आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन आणि उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गो-हे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी ठरला. हा रस्ता करण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे लागणारा दिनावधी यामुळे कमी झाला असुन लवकरच रस्ता विकसन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात यावे यासाठी उपमुख्यमंत्री यांनीदेखील पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना सूचना दिल्या आहेत.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद – सविस्तर बातमी 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,पुणे महानगरपालिका,जिल्हाधिकारी पुणे यांच्यातील प्रशासकीय व तांत्रिक गुंतागुंतीमध्ये हा रस्ता प्रश्न सुटत नसल्याने डॉ नीलम गो-हे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून,उपोषणकर्ते,स्थानिक पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी यांच्यात समन्वयाने रस्ता प्रश्नात तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील संबंधितांना सूचना दिल्या होत्या.स्थानिक नागरिक, वाहतूकदार आणि विद्यार्थ्यांसाठी दररोजची मोठी डोकेदुखी ठरलेला हा रस्ता प्रश्न आता मार्गी लागला आहे.वाघोली आणि आसपासच्या भागातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात यामुळे कमी होणार असून नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. यशाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉ. नीलम गो-हे यांचे आभार मानले आहेत. विकास कामांसाठीही अशीच साथ लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×