Breking News
Pune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यात

बांगलादेशी तरुणीला धमकावून वेश्याव्यवसायात धाडले

बांगलादेशी तरुणीला धमकावून वेश्याव्यवसायात धाडले

नकार दिल्याने खोलीत डांबून मारहाण

marathinews24.com

पुणे – बांगलादेशी तरुणीला धमकावून वेश्याव्यवसायात धाडले – ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने बांगलादेशी तरुणीला भारतात आणले. त्यानंतर दलालांनी तिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात डांबून तिला वेश्याव्यवसाय करण्यासाठी धमकावले. तिने नकार दिल्यानंतर खोलीत डांबून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एका सामाजिक संस्थेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर सहकारनगर पोलिसांच्या मदतीने युवतीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी दलालांसह कुंटणखाना मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

याबाबत सामाजिक संस्थेकडून फिर्याद देण्यात आली आहे. अभिषेक संथेबेन्नूर, तमन्ना शेख, रकीब खान यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा), बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण प्रतिबंध कायदा (पोक्सो), पारपत्र अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभिषेक आणि तमन्ना यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती आरोपी तमन्नाच्या ओळखीची आहे. तिने तिला भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. बंगळुरूत ती आरोपी रकीब याच्याकडे आली. ब्युटी पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष तिने तिला दाखविले होते. आरोपींनी युवतीला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले. तिने नकार दिला. आरोपी अभिषेक हा तमन्नाचा ओळखीचा आहे. ताे एका हाॅटेलमध्ये काम करतो. तमन्न आणि अभिषेकने युवतीला सहकारनगर भागातील एका खोलीत डांबून ठेवले. युवतीला वेश्याव्यवसाय करण्यसााठी धमकाविले. तिने नकार दिल्यानंत तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली.

तरुणीने बांगलादेशी पोलिसांना या घटनेची माहिती मोबाइलवरुन दिली. बांगलादेशातील पोलिसांनी शहरातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. समाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यतील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण आणि पथकाने शुक्रवारी रात्रभर शोधमोहिम राबविली. शनिवारी दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून युवतीची सुटका करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×