Crime News : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा

Crime News : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा

अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणेCrime News :आयआयएफएल फायनान्सीयल ग्रुपचे सदस्य असल्याचे भासवून सायबर चोरट्याने एकाला लिंक पाठविली. त्याद्वारे गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २८ लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २४ मार्च ते ६ मे कालावधीत वारजे माळवाडीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिवनेरी बसमधून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वारजे माळवाडीत राहायला असून, २४ मार्चला मोबाइलधारक सायबर चोरट्याने त्यांना आयआयएफएल फायनान्सीयल ग्रुपचे सदस्य असल्याचे भासवले. तक्रारदाराच्या मोबाइलवर लिंक पाठवून त्याद्वारे अकाउंट तयार करण्यास भाग पाडले. त्यानंतर गुंतवणूक करण्यास सांगून ऑनलाईनरित्या लाखो रूपयांचा नफा होत असल्याचे खोटे पुरावे दाखविले. विश्वास संपादित झाल्यानंतर संबंधिताने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. अवघ्या दीड ते पावणेदोन महिन्यांत तब्बल २८ लाखांहून अधिक रकमेची गुंतवणूक केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठून आपली वैâफियत मांडली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे तपास करीत आहेत.

धनादेश वठवण्याची केली बतावणी, जेष्ठेला १२ लाखांचा गंडा

Crime News : धनादेश वठवण्यासाठी माहिती संकलित करण्याचा बहाणा करीत सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेला १२ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ ते २६ जूनला खडकी परिसरात घडली असून, ६० वर्षीय महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला खडकीत राहायला असून, त्यांनी काही दिवसांपुर्वी एक धनादेश बँकेत जमा केला होता. त्याच अनुषंगाने सायबर चोरट्यांनी महिलेला फोन करून धनादेश जमा करण्यासाठी एक फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेच्या बँकखात्याचा अ‍ॅक्सेस घेउन त्यांच्या बँकखात्यातून तब्बल १२ लाख रूपये स्वतःच्या खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली. बँकखात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर जेष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×