शिवनेरी बसमधून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला

शिवनेरी बसमधून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला

स्वारगेट एसटी स्थानकातील घटना

marathinews24.com

पुणे – शिवनेरी बसमधून साडेचार लाखांचा ऐवज चोरीला – एसटी स्थानकात थांबलेल्या शिवनेरी बसमध्ये शिरून चोरट्याने महिला प्रवाशाच्या ट्रॉली बँगमधून २० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २७ जुनला सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातील बोरवलीच्या दिशेने जाणार्‍या शिवनेरी बसमध्ये घडली आहे. याप्रकरणी कोल्हापूरमध्ये राहणार्‍या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांना अभय कोणाचे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोल्हापूरमध्ये राहायला असून, २६ जूनला बोरिवली बसमधून प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान शिवनेरी बस स्वारगेट स्थानकात थांबली असता, चोरट्याने महिलेची ट्रॉली बॅग कापून रोकडसह ४ लाख ५३ हजारांचा सोन्या -चांदीचा ऐवज चोरून नेला. स्वारगेट बसस्थानकातून निघण्यापूर्वी मागे बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बस निघण्यापूर्वी बसमधुन खाली उतरून तेथुन निघुन गेला. त्याने ट्रॉली बॅग कापून त्यातील २० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी केली. पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करीत आहेत.

पीएमपीएल बसप्रवासात पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

पीएमपीएल बसमधील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने महिलेच्या पर्समधील १ लाख ७४ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना १२ जुलैला सकाळी १० ते अकरा वाजण्याच्या सुमारास कोथरूड ते नवले ब्रीज प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेनी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार देशमुख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×