Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांना अभय कोणाचे

जिल्ह्यासह शहरात बांग्लादेशींची झाडाझडती गरजेची

marathinews24.com

पुणे – पुण्यात बांगलादेशी घुसखोरांना अभय कोणाचे – शहरासह जिल्ह्यातील विविध भागात राहाणार्‍या बांगलादेशी नागरिकांना अटक पोलिसांना यश आले आहे. मात्र, संबंधित बांगलादेशींना मतदान कार्डपासून, रहिवाशी पुरावा, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अभय देणार्‍यांविरूद्धही कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. प्रामुख्याने एमआयडीसीसह उपनगरांमध्ये छुप्या पद्धतीने बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य तपास यंत्रणांसह सुरक्षा विभागाला आव्हान निर्माण करीत आहेत. मागील काही महिन्यांपासून पोलिसांनी बांगलादेशीविरूद्ध कारवाईचा वेग वाढविला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेउन अशा घुसखोरांना अभय देणे टाळले पाहिजे.

बीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी

हिंदुस्थानात विनापरवाना येउन पुण्यातील बुधवार पेठ वेश्याव्यवसाय करणार्‍या बांग्लादेशी महिलांचा फरासखाना पोलिसांनी नुकताच पर्दापाश केला आहे. याप्रकरणी ८ महिलांना अटक करण्यात आले असून, त्यांना लवकरच त्यांच्या देशात पाठविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. विनापरवाना राहणार्‍या बांग्लादेशी नागरिकांची सर्चमोहिम राबवून झालेल्या कारवाईत महिलांचे बिंग फुटले आहे. बांग्लादेशी महिला छुप्या पद्धतीने देशाची सीमा पार करुन अवैधरित्या हिंदुस्थानात आल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी आपण पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुण्यातील रेडलाईट एरियामध्य वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करला होता. वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेउन, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. प्रत्यक्षात मात्र, अनेक महिन्यांपासून बांग्लादेशी महिलांचे वास्तव्य तपास यंत्रणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.

शिक्षण, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी पुण्यासह उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात परप्रांतीय नागरिकांना ओढा वाढला आहे. त्याचाच फायदा घेउन बांगलादेशी नागरिकही छुप्या पद्धतीने हिंदुस्थानमध्ये प्रवेश करून पुण्याकडे धाव घेत असल्याचे कारवाईवरून दिसून आले आहे. बांधकाम व्यवसाय, खासगी कंपनीत कामासह मिळेल त्या रोजंदारीवर पैसे मिळवित घुसखोर उपजिवीका भागवित आहेत. मात्र, कोणतीही परवाना न घेता, विना पासपोर्ट, व्हिसा हिंदुस्थानात प्रवेश करीत बांग्लादेशींनी तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे देशातंर्गत सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. रोजंदारीच्या आडून स्थानिक भागातील रेशनकार्ड, मतदानकार्ड मिळवून काही बांग्लादेशी आता हिंदुस्थानी नागरिक म्हणून मिरवत आहेत. त्यांचाही ठावठिकाणा शोधून पुन्हा त्यांना त्यांच्यात देशात माघारी पाठविणे अत्यावश्यक आहे.

पुण्यासह उपनगरातील काही एजंटाकडूनही पैशांसाठी बांग्लादेशीना थेट कागदपत्रांची उपलब्धता करून दिली. कागदपत्रे तयार झाल्यानंतर संबंधित बांग्लादेशी लोक १० वर्षांपासून जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात राहत असल्याचे कारवाईवरून दिसून आले आहे. बेकायदेशिररित्या वास्तव्य करणार्‍या २१ बांग्लादेशी नागरिकांना काही महिन्यांपुर्वी अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकासह रांजणगाव पोलिसांना यश आले होते. बांग्लादेशी मागील सहा महिने ते १० वर्षांपासून रांजणगावातील कारेगाव परिसरात राहायला होते. इमारत बांधकामासाठी ते बिगारी काम करीत होते. त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदानकार्ड आढळून आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी घुसखोर तरुणीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, बांगलादेश) हिला ताब्यात घेतले आहे. मुसलमिया ३ डिसेंबरला पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक सहाजवळ असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. हद्दीत गस्त घालणार्‍या पोलिसांच्या पथकाला संशय आल्याने तिची चौकशी केली. तेव्हा ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र, तसेच हिंदुस्थानात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. एजंटाच्या मध्यस्थीने तिने देशात बेकायदा प्रवेश केल्याचे उघडकीस आले.

देशाची सीमा ओलांडून हिंदुस्थानात प्रवेश

हिंदुस्थान- बांगलादेश सिंमा ओलांडुन वैध्य पारपत्र परवाना धारण न करता बांगलादेशींकडून प्रवेश मिळविला जातो. बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड धारण करून ते राहतात. एजंटाकडून त्यांचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड तयार केले जाते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह एजंटांनी काही रक्कमेच्या लालसेपोटी घुसखोरी करणार्‍या बांगलादेशींना थारा न देणे आवश्यक आहे. दरम्यान, एमआयडीसी परिसरात बिगारी काम करण्यासह बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या प्लॅस्टर, वाळू-वीटांची वाहतूकीची कामे बांग्लादेशींकडून केली जातात. घुसखोर नागरिक उदरनिर्वाह करत असून, त्यांची कोणतीही माहिती न घेता संबंधितांना कामावर ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×