Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

बीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

बीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक

marathinews24.com

पुणे – शहराच्या विकास आराखड्यांतर्गत बायोडायव्हर्सिटी डेव्हलपमेंट प्लॅन – BDP व हिलटॉप हिलस्लोप झोन मधील प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत डोंगर माथा आणि डोंगरउतार अंतर्गत निश्चित करावयाचा बीडीपी झोन ,याबाबतच्या भूसंपादनातील समस्या,यातील अनाधिकृत बांधकामे,जनतेच्या प्राप्त तक्रारी व निवेदने यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड; गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान – सविस्तर बातमी 

शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने आरक्षणाची मुदत संपण्याआधी आपला अहवाल सादर करावा.यामध्ये स्थानिक आमदार,खासदार,इतर लोकप्रतिनिधी यांचे अभिप्राय घेण्यात यावेत तसेच पर्यावरणवादी संघटना व पर्यावरण तज्ञांच्या मतांचाही विचार करावा.यासाठी आरक्षित निर्मनुष्य क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.तसेच माळीन,इर्शाळवाडी सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जांभूळवाडी काळेवाडी सारख्या डोंगर उतारावरील अनधिकृत बांधकामे,प्रस्तावित बांधकामे यासाठी नियमावली तयार करावी व त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी त्यांनी सूचना केली.

बीडीपी क्षेत्रात येणाऱ्या आणि स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या कुटुंबांच्या नुकसानभरपाई व पुनर्वसनाच्यामुद्द्यावर बोलताना,या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेऊन या संदर्भातील निर्णय प्रक्रिया राबवली जावी, अशी सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात समितीच्या शिफारशी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असून अंतिम निर्णय घेताना पर्यावरण संरक्षण आणि लोकभावना विचारात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बैठकीत शहरी वने (Urban Forest) या संकल्पनेवरही विशेष भर देण्यात आला. शहरी भागात पर्यावरण संवर्धनाकरिता वनसंपदा वाढविणे आणि स्थानिक भूधारकांना देखिल योग्य न्याय मिळेल या या दृष्टीने असे प्रकल्प राबविलेल्या महानगरपालिका/नगरपालिका यांच्या कार्याचा अभ्यास करावा अशा सूचना डॉ गो-हे यांनी दिल्या.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,उपसचिव नगरविकास श्रीमती छापवाले,शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे,भूसंपादन अधिकारी श्रीमती श्वेता दारुणकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×