Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Bappacha Katta Pune : सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या नव्या पर्वाचा ‘बाप्पाचा कट्टा’

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

marathinews24.com

पुणे – Bappacha Katta Pune : सांस्कृतिक परंपरेचा गौरव जपत, सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या उद्देशाने ‘बाप्पाचा कट्टा’ हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाचा फर्ग्युसन महाविद्यालय येथे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कलारसिक, साहित्यप्रेमी, संस्कृतीरक्षक, गणेश भक्त व सर्व नागरिकांनी बाप्पाचा कट्टा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. आशिष शेलार यांनी केले.यावेळी अभिनेते प्रवीण तरडे, Bappp.org चे व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर उपस्थित होते.

पिण्याचे पाणी आणि शेतीच्या नियोजनासाठी समन्वयाने काम करा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी

शेलार म्हणाले, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने यावर्षी गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. या महोत्सवाअंतर्गत देशात व राज्यात तालुका स्तरापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी दुबईमध्ये देखील राज्य महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाची वर्ल्ड युनोस्को कडे वाटचाल असून सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या bappa.org उपक्रमांतर्गत ‘बाप्पाचा कट्टा’ हा ९० दिवसांचा सांस्कृतिक महाउत्सवात या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबे, मित्रमंडळी आणि कलाकारांना कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उखाणे, मंगळागौरीचे खेळ, भोंडला, पोवाडे, विविध लोककला, मराठी म्हणी, अंताक्षरी अशा पारंपरिक कलाप्रकारांसह आधुनिक कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. गणेशोत्सव धार्मिक, श्रद्धेचे अधिष्ठान आहे.या उत्सवाला राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली आहे. कला, साहित्य, रंगसंगती यांचा सुंदर मिलाप इथे पाहायला मिळतो. Bappa.Org हे व्यासपीठ सर्व जगभरातील गणेश भक्तांना आपल्या कथा सांगण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×