Breking News
Pune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूकPune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजन

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारी

निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, दि. ४ मे रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाऊन, एमआयडीसी बारामती येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.
या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार – सविस्तर बातमी

निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीसाठी २० टेबल्स तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी ६ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी ३० सूक्ष्म निरीक्षक, ३० मतमोजणी पर्यवेक्षक, ३० मतमोजणी सहाय्यक तसेच इतर कर्मचारी व अधिकारी मिळून सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहा.निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याकडून मतमोजणी करिता नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणीस्थळी प्रवेशासाठी प्रथमच क्युआर कोड प्रणाली लागू करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेल्या प्रवेशिकांवर क्युआर कोड देण्यात आला आहे. तो क्युआर कोड स्कॅन करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्रात सर्व कर्मचारी व प्रतिनिधींना मोबाइल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×