Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

वडवणी, धारूर, नेकनूर ,तलवाडा हद्दीतील शेळ्या चोरणारी टोळी जेरबंद

वडवणी, धारूर, नेकनूर ,तलवाडा हद्दीतील शेळ्या चोरणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, चार लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) : जिल्ह्यातील विविध तालुक्यात शेळ्यांची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. यावेळी पकडलेल्या आरोपींनी वडवणी, धारूर, नेकनूर आणि तलवाडा हद्दीतील अशा सहा गुन्ह्यांची कबूली दिली आहे. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.सदरील गुन्हातील आरोपी कडून चार लाख ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन वडवणी गु.र.नं १३९/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्या. सं प्रमाणे शेळी चोरीचा गुन्हा नोंद झाला होता.

हडपसरमधील घरफोडीचा छडा – सविस्तर बातमी 

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड हे करीत होते. दि. २५ जुलै २०२६ रोजी पोउपनि महेश विघ्ने यांचे पथक पेठ बीड पोलीस स्टेशन हद्यीत सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना गोपनिय माहीती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा सुभाष किसन विटकर (रा. गांधीनगर, बीड) याने केला आहे व तो खंडेश्वरीदेवी मंदीरासमोरील ग्राऊंड येथे त्याचे मित्रांसह थांबलेला आहे. यावरुन पथकाने सदर ठिकाणी जाऊन सुभाष विटकर व त्याचे ईतर दोन मित्र बेग रफीक बेग रशीद (रा. बलभीम चौक, बीड) व इमरान चाँद शेख (रा. तेलगाव नाका, बीड यांना त्यांचे कडील स्विफट गाडीसह ताब्यात घेऊन शेळया चोरीबाबत विचारणा केली असता यातील सुभाष विटकर याने सांगितले की त्याने त्याचे वरनमुद दोन मिञासह मिळून त्याचे कडील स्विफट गाडीने वडवणी, धारुर, नेकनूर, तलवडा हद्दीत जाऊन दिवसा व रात्रीचे वेळी शेळया चोरी केल्या आहेत.

सदर आरोपीनी सहा गुन्ह्यांची कबूली दिली आहे. यामध्ये वडवणीतील तीन, नेकनूर, धारूर आणि तलवाडा येथील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. सदर तीन ओरापीकडुन गुन्हात वापरलेले वाहन व रोख रक्कम असा एकूण ४,८५,००० रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. तीन आरोपीतांना मुद्येमालासह पो.स्टे. वडवणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक, अंबेजोगाई चेतना तिडके सहा. पोलीस अधिक्षक, व्यंकटराम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, दिपक खाडेकर, जफर पठाण, अर्जुन यादव चालक गणेश मराडे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×