Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

रोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

रोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

कामगार उपआयुक्तांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मात्र, या संधींचा गैरफायदा घेत काही फसवणूक करणारे व्यक्ती व बनावट संस्था बेरोजगार युवक-युवतींना आयटी तसेच इतर नामांकित उद्योगांमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज व्याज परतावा योजना अधिक सुलभ; ऑनलाईन सुविधांमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा – सविस्तर बातमी 

या पार्श्वभूमीवर, कामगार उप आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हा यांनी सर्व बेरोजगार तरुण-तरुणींना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली कोणत्याही कंपनी, कंत्राटदार, सल्लागार किंवा एजंट यांना कोणतीही आर्थिक रक्कम देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, कोणत्याही कंपनीत नोकरी स्वीकारण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत नोंदणी, अटी व शर्ती, वेतनाची खात्री करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय, कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या PF व ESIC यांसारख्या कायदेशीर सुविधांची खात्री करून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

जर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून नोकरीच्या नावाखाली आर्थिक मागणी करण्यात आली, तर तात्काळ संबंधित शासकीय विभागांना माहिती द्यावी. नागरिकांनी सजग राहून अशा फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन निखील वाळके कामगार उप आयुक्त यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×