Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी

marathinews24.com

पुणे – जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर नवीन ३२ हजार ६४६ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे, यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचविण्याच्यादृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरले आहे.

संयुक्त जयंती महोत्सव 2026 : बोपोडीत भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल – सविस्तर बातमी

जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४ हजार ३९५ व नागरी भागात १ हजार ६९९ असे एकुण ६ हजार ९४ अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. पुणे महानगरपालिकेअंतर्गत १० हजार ३४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ३ हजार ७१०, आंबेगाव तालुक्यात ९५२ ,बारामती १ हजार ७५५, भोर ५२३, दौंड १ हजार ५१४, हवेली २ हजार ५५, इंदापूर १ हजार ४९४, जुन्नर १ हजार ६६१, खेड २ हजार ६४, मावळ १ हजार ७१२, मुळशी ७८८, पुरंदर ८८४, शिरुर १ हजार ९२६ आणि वेल्हे तालुक्यात १२४ तसेच शहरी भागात १ हजा ४५० याप्रमाणे नवीन ३२ हजार ६४६ लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

पीएमएमव्हीवाय गरोदर महिलांना गरोदरपणाच्या काळात त्यांचा आहार व आरोग्य चांगले राहावे व गरोदरपणाच्या कालावधीत त्यांनी मंजुरी करू नये तसेच मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे याकरता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबविण्यात येते. सन २०१७ पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती.योजना महाराष्ट्रात जून-२०२५ पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

योजनेचे निकष : १८ वर्षे ७ महिने ते वयाच्या ५५ व्या वर्षाच्या दरम्यान गरोदर होणाऱ्या महिलां या योजनेसाठी पात्र असतात.पहिल्या आपत्यासाठी मुलगा असो व मुलगी तसेच दुसरे अपत्य फक्त मुलगी असल्यास लाभ देय आहे. केंद्र व राज्य शासन,सार्वजनिक उपक्रम अंतर्गत नोकरीवरील महिलांना योजनेचा लाभ देय नाही.

योजनाचा लाभ घेण्याकरिता पुढील १० पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. यामध्ये ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष ८ लाखापेक्षा कमी आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, ४० टक्के व अधिक अपंगत्व असणा-या (दिव्यांग जन) महिला, बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला, आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत महिला लाभार्थी, ई-श्रम कार्डधारक महिला, किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी, मनरेगा जॉब कार्ड धारक महिला, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत रेशनकार्डधारक महिला लाभार्थी पात्र आहे.

पहिल्या अपत्यासाठी गरोदरपणांची नोंदणी केल्यांनतर ३ हजार रुपये, बाळाच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर २ हजार रुपये तसेच दुसऱ्या अपत्यासाठी (फक्त मुलगी असल्यास) गरोदरपणाची नोंदणी अनिवार्य असून बाळाचे जन्मप्रमाणपत्र सादर केल्यास ६ हजार रुपयाचा लाभ मिळतो. योजनेचे लाभ थेट लाभ हस्तांतरणपद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो. अंगणवाडी सेविकेला प्रोत्साहान भत्ता म्हणून प्रति लाभार्थी रक्कम रुपये २५० रुपये मिळते.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता नजीकच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आवश्यक कागदपत्र जमा करावे. तसेच लाभार्थी स्वतः www.pmmvy.wcd.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइनपद्धतीने अर्ज करू शकतात.

आनंद खंडागळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास): जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच महिला बालकल्याण सभापती अंकिता पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाभार्थ्यांच्या नोंदीचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून उर्वरित पात्र महिलांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×