Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

भाजपमध्ये एकाच प्रभागातून जावई–सासऱ्यांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

भाजपमध्ये एकाच प्रभागातून जावई–सासऱ्यांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

जावई व सासरे यापैकी भाजप पक्ष नेमकी कुणाला उमेदवारी देणार याकडे शहराचे लक्ष

marathinews24.com

पिंपरी – पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली गणिते जुळवण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात नात्यागोत्याचे राजकारण पूर्वीपासून चालत आले आहे. त्याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक २७ मध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागात भाजपमधून जावई आणि सासरे दोघेही इच्छुक असल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

निकृष्ट कामाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे बोंबाबोंब आंदोलन – सविस्तर बातमी 

राज तापकीर हे भाजपचे युवा कार्यकर्ते व पदाधिकारी असून, गेल्या काही वर्षांपासून ते प्रभाग क्रमांक २७ मध्ये काम करत आहेत. प्रत्येक कामात अग्रेसर असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, त्यांचे सासरे चंद्रकांत नखाते हे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, क्रीडा समितीचे माजी सभापती देखील राहिले आहेत. त्यामुळे तेही इच्छुक आहेत . आता जावई राज तापकीर यांच्यासाठी सासरे एक पाऊल मागे सरकतील की हट्ट धरतील याबाबत उत्सुकता आहे

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, असा विश्वास राज तापकीर यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उमेदवारीबाबत मला शब्द दिला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या उमेदवारीच्या स्पर्धेमुळे कुटुंबात कोणताही दुरावा किंवा कटुता निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज तापकीर हे इच्छुक सासरे चंद्रकांत नखाते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. त्याच पार्श्वभूमीवर आता सासऱ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.

एकूणच, प्रभाग क्रमांक २७ मधील उमेदवारी तिकीटवरून जावई व सासरे यापैकी भाजप पक्ष नेमकी कुणाला उमेदवारी देणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×