भाजपचे गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न

५ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवारांना शिवीगाळ करुन गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे, सागर कांबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बीडमध्ये दिवसाढवळ्या मजुराची हत्या करणाऱ्याला घेतले ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (१० जानेवारी) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आरोपी धेंडे, भिमाले, कांबळे, शिंदे आले होते. भाजपचे प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार तेथे होते. त्यावेळी आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द उच्चारले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे हा उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कांबळेला रोखले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम नामावडे, उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×