Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

बीडमध्ये दिवसाढवळ्या मजुराची हत्या करणाऱ्याला घेतले ताब्यात

बीडमध्ये दिवसाढवळ्या मजुराची हत्या करणाऱ्याला घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांची कळंब-केज रोडवर कारवाई

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – शहरातील अंकुशनगर परिसरात प्लंबिंग काम करणाऱ्या मजुरावर दिवसाढवळ्या गोळीबार करून व धारदार शस्त्राने वार करत निघृण हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी कळंब-केज रोडवर केजजवळ त्याला ताब्यात घेतले आहे. विशाल सुर्यवंशी असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.

बीडमधील नेकनूरच्या बाजारामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ६ जानेवारीला दुपारी अंकुश नगर मध्ये हर्षद तुळशीराम शिंदे या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडत व नंतर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार करण्यात आले होते. या घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी पुजा पवार यांनी ही हत्या झाल्यानंतर तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगरच्या पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना केले होते . घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तब्बल पाच दिवसांच्या शोधानंतर दि.१० जानेवारीला रात्री ८.३० वाजता कळंब-केज रोडवरून केजजवळ आरोपी विशाल सुर्यवंशीला अटक केली. गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर, पीएसआय सुशांत सुतळे, कर्मचारी मनोज वाघ, राहुल शिंदे, अर्जुन यादव, मनोज परझने, अश्फाक सय्यद, नितीन वडमारे, सिद्धेश्वर मांजरे, पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली. आरोपीला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कुटूंबाची बदनामी होत असल्याने केली हत्या

आमच्या कुटूंबाची बदनामी करत असल्याच्या कारणावरून मी हर्षद शिंदे यांची हत्या केली असल्याचे आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. दरम्यान हत्येचे हेच कारण होते की अन्य काही हे मात्र आता तपासातून स्पष्ट होणार आहे.

हत्या करून तो गेला तुळजापुरला

बीडमध्ये हत्या केल्यानंतर आरोपीला कुठे जावे आणि काय करावे याचे भान राहिले नव्हते, त्यानुसार तो मोटारसायकलवर पाटोद्यावरून मांजरसुंबा-केज तर पुन्हा केजवरून मांजरसुंबा आणि मांजरसुंब्यावरून तुळजापुरकडे गेला. काल तो तुळजापुरवरून कळंबमार्गे केजमध्ये येत होता, सायंकाळी साडे सात वाजता केज जवळ त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यावेळी गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×