Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

बीडमधील नेकनूरच्या बाजारामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

भरदिवसा सराफाची दागिन्याची बॅग पळवली

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील नेकनूरच्या बाजारामध्ये रविवारी ( दि ११) भरदिवसा सराफाची सोन्याची पिशवी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नेकनूरच्या बाजारामध्ये अज्ञात चोरट्यांनी बाजारामध्ये दुकान लावत असलेल्या सराफाची चांदीची बॅग लंपास केली. यामध्ये तब्बल १५ ते २० किलो चांदी असल्याचे सांगण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ४० लाखांवर आहे.

मेट्रोमोनिअलद्वारे लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस दाखल झाले. बाजारामध्ये चोरट्यांचा शोध पोलीसांकडून सुरू केला. या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेबाबतचा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे. नेकनूर येथील बबनराव कानडे हे सराफ व्यापारी बाजारामध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय करतात. दि.११ रोजी सकाळी अकराच्या सुमारासत्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले होते. मकर संक्रातीचा बाजार असल्याने महिलांसाठी चैन, पायातील पैंजन, जोडवेयासह अन्य चांदीचे आभूषण मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले होते. पंधरा ते वीस किलो चांदी असलेली बॅग त्यांनी गाड्यावर ठेवली आणि खाली चटई अंथरू लागले होते.

तेवढ्यात काही मिनिटांच्या कालावधीमध्ये त्याठिकाणी चोरटे आले. त्या अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग घेऊन पळ काढला. ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब रोकडे, उपनिरीक्षक तांदळे, प्रशांत क्षीरसागर, रतन निनगुडे, बाळा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×