Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

मेट्रोमोनिअलद्वारे लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

मेट्रोमोनिअलद्वारे लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

२६ लाख ५० हजारांची केली फसवणूक

marathinews24.com

पुणे – अनुरूपविवाह मेट्रोमोनिअल साईटद्वारे ओळख झाल्यानंतर महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तब्बल २६ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १५ जून ते १५ सप्टेंबर २०२५ कालावधीत येरवडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी संबंधित ४३ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि वापरकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेअर ट्रेडींगद्वारे परताव्याचे आमिष पडले २८ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा परिसरात राहायला असून, त्यांनी लग्नासाठी मेट्रोमोनिअर साईटवर प्रोफाईल अपलोड केले होते. त्याठिकाणी त्यांची एकाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढत गेला होता. संबंधिताने महिलेला लग्न करण्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांना विविध कारणांसाठी पैसे पाठविण्यास सांगितले.

लग्न होईल या आशेमुळे महिलेने आरोपीच्या सांगण्यानुसार पैसे पाठवण्यास सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यांत तब्बल २६ लाख ५० हजार रूपये पाठवल्यानंतरही संबंधिताने पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.

मेट्रोमोनिअल साईटद्वारे फसवणूकीच्या घटना

अनुरूपविवाह या मेट्रोमोनिअल साईटद्वारे महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २६ लाख ५० हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. दरम्यान, अशाच पद्धतीने यापुर्वीही मेट्रोमोनिअल साईटद्वारे महिलांसह मुलींना लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×