Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुण्यात जिगरबाज पोलिसांनी बुडणाऱ्या तरुणीला वाचविले

पुण्यात जिगरबाज पोलिसांनी बुडणाऱ्या तरुणीला वाचविले

मित्रमंडळ चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – गस्त घालणाऱ्या जिगरबाज पोलीस शिपायांनी मित्रमंडळ चौकातील कालव्यात उडी मारणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचे प्राण वाचविल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कालव्यात तरुणीने उडी मारल्याची माहिती रात्री साडेअकराच्या सुमारास मिळताच पोलीस शिपाई किरण पवार आणि राहुल उन्हाळे यांनी अंधारात पाण्यात उडी मारून तरुणीचे प्राण वाचविले. पोलिसंच्या जिगरबाज कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरिकांनीही कौतुक करीत त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश – सविस्तर बातमी 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात गंभीर गुन्हे रोखण्याससाठी काॅप्स-२४ ही योजना सुरू केली आहे. पोलीस शिपाई किरण पवार, राहुल उन्हाळे हे या पथकात नियुक्तीस आहेत. पर्वती भागात गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मित्रमंडळ चौकातील पाटील प्लाझा इमारतीच्या परिसरात एका तरुणीने मुठा कालव्याच्या परिसरात जाळीला धरून थांबली होती. तरुणी आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असल्याचे नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी तिला समजावून सांगितले. मात्र, तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तरुणीने काही समजाण्याच्या आत कालव्यात उडी मारली.

नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहून पोलीस शिपाई पवार आणि उन्हाळे यांनी दुचाकीवरुन तेथे धाव घेतली. प्रसंगावधान राखून पोलीस शिपाई पवार यांनी कालव्यातील वाहत्या पाण्यात उडी मारली. अंधार असल्याने वाहणाऱ्या तरुणीचा शोध घेण्यास अडचण आली. पावसाळ्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. पाण्याला वेग जास्त होता. अशा परिस्थितीत पोलीस शिपाई पवार आणि उन्हाळे यांनी तिला पाण्यातून बाहेर काढला. तरुणीला धीर देऊन तिची विचारपूस केली. संबंधित तरुणी विवाहित असून, ती पतीपासून वेगळी राहते. तिला दोन मुले आहेत. कामाच्या निमित्ताने ती पुण्यात आली असून, मैत्रिणीसोबत ती राहते. नैराश्यातून तिने कालव्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे तरुणीने सांगितले. स्वारगेट पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदविला आहे. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. तिला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×