Breking News
Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न

राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे यश

मॅरेथॉन स्पर्धा

10 ऑगस्ट रोजी 17 ते 25 वयोगटाकरिता 5 किलो मीटर मॅरेथॉन स्पर्धा केली होती आयोजित

marathinews24.com

पुणे – राज्यस्तरीय रेड रन मिनी मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक तथा उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 10 ऑगस्ट रोजी 17 ते 25 वयोगटाकरिता 5 किलो मीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय ‘रेड रन मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेमधील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक विजेते व जिल्हा प्रश्नमंजुषा प्रथम क्रमांक विजेत्यांना जिल्ह्यांचे प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले.

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अर्थसहाय्यकरिता अर्ज करण्याचे आवाहन – सविस्तर बातमी 

मिनी मॅरेथॉन क्रिडा प्रकारामध्ये मुलींच्या गटात जिल्ह्यातील वाघोली येथील जैन संघटना महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी मानसी यादव भारती हिने प्रथम क्रमांक पटकावला तसेच मुलांच्या गटामध्ये पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार गणेश आठवले यांने व्दितीय क्रमांक पटकावला. राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये 13 ते 17 वयोगटात हडपसर येथील साधना विद्यालयाचा विद्यार्थी कुमार यश गर्जे यांने प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये व्दितीय क्रमांक पटकावला आहे, असेही डॉ. यमपल्ले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×