Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर ‘ब्रीथ अ‍ॅनालायजर’उतारा

पुण्यात मद्यपी वाहन चालकांवर ‘ब्रीथ अ‍ॅनालायजर’उतारा

अहवाल थेट वाहतूक नियंत्रण कक्षात जाणार

marathinews24.com

पुणे – मद्यपान करून वाहन चालवणार्‍या बेशिस्तांविरूद्ध कारवाईसाठी वाहतूक विभागाने अत्याधुनिक ब्रीथ अ‍ॅनालायझरचा उतारा शोधला आहे. वाहतूक शाखेकडून अत्याधुनिक १० ब्रीथ अ‍ॅनालायजर यंत्रे खरेदी केली असून, संबंधित यंत्रे थेट वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष आणि मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडली आहेत. त्यामुळे आता मद्यपी वाहन चालकांवर प्रभावी आणि पारदर्शक कारवाई होण्यास मदत होणार आहे.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात अमली पदार्थांविषयी जनजागृती – सविस्तर बातमी 

बेशिस्त आणि बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांमुळे शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने मद्यपींकडून वाहन चालवणार्‍यांमुळे सर्वसामान्यांना जीवाशी मुकावे लागले आहे. भरधाव वेग, वाहतूक नियमांचे पालन न करणे, सिग्नल न पाळल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यापार्श्वभूमीवर आता बेशिस्तांविरूद्ध कारवाईसाठी पुणे वाहतूूक पोलिसांनी दंड थोपाटले आहेत. अत्याधुनिक बे्रथ अ‍ॅनालायझर मशीनद्वारे मद्यपी वाहन चालकांना दणका दिला जाणार आहे. आठवड्यापासून यंत्रांद्वारे मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. ही यंत्रे इंटरनेटद्वारे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडल्याने कारवाई नेमकी कशी करण्यात आली, याची माहिती त्वरीत उपलब्ध होणार आहे.

अत्याधुनिक ब्रीथ अ‍ॅनालायझरचा वॉच

अत्याधुनिक ब्रीथ अ‍ॅनालायजर यंत्रे पुणे पोलिसांचा मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रुम) आणि वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी जोडली आहेत. वाहन चालक मद्यप्राशन करुन वाहन चालवित असल्याचे उघडकीस आल्याचा अहवाल थेट नियंत्रण कक्षात पाठविला जाईल. त्यानंतर संबंधित अधिकारी दंडात्मक कारवाई करतील. तपासणीत चालकाने मद्यप्राशान केले नसल्याचे आढळून आल्यास त्याचीही माहिती नोंदविली जाणार आहे. यंत्रणेमुळे प्रत्यक्ष कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवरची जबाबदारी वाढणार आहे. कारवाई न केल्यास त्याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे.

मद्यपी चालकांवरील कारवाई

वर्ष – २०२२ मद्यपींवरील
कारवाई – ३७२

वर्ष  – २०२३ – मद्यपींवरील
कारवाई  ६१०

वर्ष  – २०२४ – मद्यपींवरील
कारवाई ५ हजार २८६

वर्ष – २०२५ – मद्यपींवरील
कारवाई  ३ हजार ३६२

( १५ ऑगस्टपर्यंत )

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×