Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

गोंधळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा, महापौर नागपुरे, धातुंडे यांचा नागरी सत्कार

गोंधळी समाजाचा वधू-वर परिचय मेळावा, महापौर नागपुरे, धातुंडे यांचा नागरी सत्कार

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ५ एप्रिलला समारंभ; परेश गरुड यांची माहिती

marathinews24.com

पुणे – अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना आणि गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ, पुणे यांच्या वतीने समाजातील युवक-युवतींना विवाहासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मोफत वधू-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (ता. ५ एप्रिल) सकाळी १० वाजता कर्वेनगर येथील शुभारंभ लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे, अशी माहिती गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी उपाध्यक्ष चंदन अटक, सचिव हरीष पाचंगे, खजिनदार रमेश उबाळे, अखिल भारतीय गोंधळी समाजाच्या सदस्य रजनी पाचंगे आदी उपस्थित होते.

काळजात आठवण आणि मानेवर टॅटू; भावाच्या न्यायासाठी धनंजय देशमुखांचा अनोखा लढा – सविस्तर बातमी 

परेश गरुड म्हणाले, “या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धवजी काळे असतील. तसेच पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे आणि इचलकरंजीचे महापौर उदयजी धांडे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून वधू-वर नोंदणी, सर्वेक्षण तसेच जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि कलाकार पेन्शन यांसारख्या शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. समाजातील तरुण-तरुणी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि कलाकार यांना एकत्र आणण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.”

गोंधळी, जोशी, बागडी, वासुदेव, चित्रकथी यांसह अन्य भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील समाजबांधवांच्या कल्याणासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. तरुणांना रोजगाराची साधने उपल्बध करून देण्यासह महिलांना आरोग्य व कौशल्य विकासाच्या सुविधा, कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हा कार्यक्रम सर्व समाज बांधवांसाठी विनामूल्य आहे. तरी अधिकाधिक समाज बांधवांनी या मेळाव्यात उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×