Breking News
पुण्यात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २८ लाखांवर बनावट नोटा जप्तअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवाहनताडी पिण्याच्या दुकानातील वाद जेष्ठाच्या जीवावर बेतला…बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या लौकिकास साजेसा एकात्मिक विकास आराखडा सादर करा- उपमुख्यमंत्री अजित पवारपुणे : खडी बारीक करण्याच्या मोटारी चोरणार्‍या कामगाराला अटकबाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावलारिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाईभरधाव टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, गुलटेकडी परिसरातील अपघातदागिने घडविणाऱ्या कारागिराला लुटले, पुण्यातील रविवार पेठेतील घटनाहाॅर्न वाजविल्याच्या वादातून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण…

हाॅर्न वाजविल्याच्या वादातून भाऊ-बहिणीला बेदम मारहाण…

टोळक्याविरुद्ध गुन्हा; भवानी पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – हाॅर्न वाजविल्याच्या वादातून टोळक्याने भाऊ-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड मारला असून, घटनेत तिघे जण जखमी झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. करण ललित केसवाणी (वय २८), भाऊ हर्ष आणि बहीण निकिता हे जखमी झाले आहेत. टोळक्याने करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. याप्रकरणी शोएब उमर सय्यद (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. करण यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मळणी यंत्रात स्कार्फ अडकला, महिलेचे शरीरापासून डोके वेगळे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करणचा भाऊ हर्ष शनिवारी (२७ एप्रिल) भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरातून निघाला होता. त्यावेळी मोटारीचा हाॅर्न वाजविल्याने आराेपी शोएब आणि हर्ष यांच्यात वाद झाला. केसवाणी कुटुंबीय हे गुरुनानकनगर परिसरातील जीवनज्योती सोसायटीत राहायला आहेत.आरोपींनी सोसायटीसमोर हर्ष यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत त्यांचे कपडे फाटले. मारहाणीचा प्रकार सुरू असताना आरडाओरडा ऐकून करण, त्यांची बहिण निकिता, आजोबा भारत हे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर आले. हर्ष यांना मारहाण का केली ? अशी विचारणा आरोपींकडे करण यांनी केली. तेव्हा आरोपी शोएब आणि साथीदारांनी करण, बहिण निकिता, आजोबा भारत यांना शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करीत आम्ही या भागातील दादा आहोत, अशी धमकी दिली. त्यानंतर शोएबने करणला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात दगड घातला.

डोक्यात दगड घातल्याने करण गंभीर जखमी झाले. टोळक्याने हर्ष यांना मारहाण करणे सुरू ठेवले. तेव्हा करण आणि निकिता यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांना दगड फेकून मारले. आरोपींनी सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दहशत माजविली. करण यांचे आजोबा भारत यांना शिवीगाळ करुन आरोपींनी घर जाळून टाकण्याची धमकी दिली.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top