Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

बुलेटराजा कारवाईच्या तडाख्यात

बुलेटराजा कारवाईच्या तडाख्यात

गाडी जप्तीसह होतायेत गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यांसारखे आवाज काढणार्‍या बुलेटरांजाविरुद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासोबतच हॉर्नमध्ये फेरफार करणार्‍या दुुकानदारांविरूद्धही मोहिम हाती घेतली आहे. नुकतेच हडपसरमधील ससाणेनगर परिसरात पोलिसांनी कारवाई करीत बुलेट चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये काळेपडळ पोलीस गुन्हा दाखल केला आहे.

काय सांगता…अवघ्या १८ दिवसांत घटस्फोट मंजूर – सविस्तर बातमी 

बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करीत फटाक्यांसारखे आवाज काढणे संबंधितांना भोवले आहे. त्यासोबतच वारजे माळवाडी, स्वारगेट वेगा सेंटर परिसरातील हॉर्न बसवणारे दुकानदार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. संबंधित दुकानदारांकडे पोलिसांनी चौकशीचा ससेमिरा सुरू केला असून, जर यापुढे बुलेट अथवा इतर वाहनांच्या हॉर्नमध्ये बदल केल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे. त्याशिवाय वाहन परवाना, तसेच दुचाकीची कागदपत्रेही न बाळगणे, हॉर्नद्वारे फटाक्यांसारखे आवाज काढणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

आठवड्याभरात १५० हून अधिक बुलेटराजा जाळ्यात

शहरातील विविध भागात बेशिस्तपणे वाहन चालवणार्‍यांविरूद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेषतः मॉडीफाईड बुलेटराजांविरूद्ध वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईला वेग आला आहे. मागील आठवड्याभरात तब्बल १५० पेक्षा जास्त बुलेटस्वार वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांनी हॉर्नसह सायलेन्सरमध्ये बदल केल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×