११ लाख ५० हजारांचा ऐवज चोरीला
marathinews24.com
पुणे – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करीत तब्बल ११ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १३ ते २१ जूनला गुरूवार पेठेतील रोशनी हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडीत राहणार्या एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साडी वाटपाच्या नावाखाली ८२ हजारांचा ऐवज चोरला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा गुरूवार पेठेतील रोशनी हौसिंग सोसायटीत फ्लॅट असून, १३ ते २१ जूनला घर बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिन्यांचा ऐवज चोरून नेला. तसेच चोरट्यांनी तक्रारदार महिलेच्या घराजवळ राहणार्या महिलेच्या घरासह मिळून ११ लाख ५१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करीत आहेत.
विश्रांतवाडीतील एकतानगरमध्ये घरफोडी
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २० जूनला सकाळी दहाच्या सुमारास एकतानगरमधील तिरूपती कॅम्प सोसायटीमध्ये घडली आहे.
याप्रकरणी तरूणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गंपले तपास करीत आहेत.