Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी

४ लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. धायरी आणि हडपसर भागात या घटना घडल्या.

शीतल तेजवाणीची सलग ६ तास चौकशी – सविस्तर बातमी

सिंहगड रस्ता भागातील धायरीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख ७१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. एकाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे धायरीतील रायकर मळा परिसरात असलेल्या गंगाविहार सोसायटीत राहायला आहेत. ११ नोव्हेंबर राेजी तक्रारदार आणि कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले.शयनगृहातील कपाटातून एक लाख ७१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक यादव तपास करत आहेत.

हडपसरमधील शेवाळवाडी भागातील सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख १९ हजार रुपयांचे दागिने लांबविले. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे शेवाळवाडीतील जाॅय व्हिलेज सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी १८ नाेव्हेंबर रोजी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातून सोन्याचे दागिने लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×