Breking News
Pune Police Crime News : बीएसनएलची केबल चोरणारा अटकेतPune Road Accident News : पुण्यात मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यूShivajinagar House Robbery Pune : शिवाजीनगर भागात घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज चोरलाHadapsar Crime News Pune : पुण्यात काळेपडळ, चिंतामणीनगरमध्ये टोळक्याचा राडाAmit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहPune Police Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारे सराईत तडीपारPune Mephedrone Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतBeed District News : दुष्काळ आणि जमिनीच्या वादातून तरूणाची आत्महत्याFarmer ID Registration Maharashtra : कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावाWakdewadi Bus Stand Theft : वाकडेवाडी एसटी स्थानकात महिलेच्या सुटकेसमधून ऐवज चोरीला

वडगाव शेरी, उरळी देवाची परिसरात घरफोडी

Shivajinagar House Robbery Pune

चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याच्या घटना वडगाव शेरी, उरळी देवाची परिसरात घडल्या आहेत. याप्रकरणी चंदननगर आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे.

पुण्यात जुन्या वादातून तरुणाचा खून; चौघांना अटक – सविस्तर बातमी

वडगाव शेरीतील नामदेवनगरातील आदर्श पात्रा इमारतीतून चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातून ५ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २४ एप्रिलला सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास केला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखडे तपास करीत आहेत.

उरळी देवाची परिसरातील मंतरवाडीतील शिवकृपा निवासातून चोरट्यांनी चार हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा २ लाख चार हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २५ एप्रिलला सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तक्रारदाराने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×