Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

शहरातील विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना

शहरातील विविध ठिकाणी घरफोडीच्या घटना

कोंढवा आणि स्वारगेट भागातील वेगवेगळ्या दोन घटना 

marathinews24.com

पुणे – कोंढवा भागातील एकाच सोसायटीतील दोन आणि स्वारगेट येथील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील खडी मशीन चौकातील उत्सव हाऊसिंग सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यंनी ५२ हजारांची रोकड, तसेच शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ हजारांची राेकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे तपास करत आहेत.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक – सविस्तर बातमी 

स्वारगेट भागातील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×