Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन

मधुमित्र मधुमक्षी पुरस्कारासाठी नामांकन अर्ज करण्याचे आवाहन

एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखी

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यावतीने सन २०२६ या वर्षाकरिता “मधुमित्र मधुमक्षी पुरस्कार” देण्यात येणार आहेत; याकरिता नामांकन अर्ज ४ मे २०२६ अखेर सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ – सविस्तर बातमी 

मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासोबतच मध उत्पादकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मंडळाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपालकांचा सन्मान करण्यात येतो.

या पुरस्कारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार दिले जाणार असून, त्यापैकी एक पुरस्कार महिला मधपालकांसाठी राखीव आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार रुपये अशी आहे.

जागतिक मधमाशी दिनाचे औचित्य (२० मे) साधून जिल्ह्यास्तरीय कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.पुरस्काराची लिंक https://mskvib.org संकेस्थळावर आहे. नामांकन अर्ज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी (संपर्क क्रमांक ०२०-२५८११८५९) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×