Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

नीलेश चव्हाण याला पकडल्याचा पोलिस नियंत्रण कक्षाला फोन

खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याबद्दल तरुणावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या प्रकरणात फरार असलेला संशयित निलेश चव्हाण याला पकडले असून त्याच्याकडे २ पिस्टल मिळाले आहेत. त्याला मारहाण करुन गाडीच्या डिकीत घातले आहे, असा फोन पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला येताच पोलिसांची धावपळ उडाली.

मुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावा – सविस्तर बातमी

प्रत्यक्षात माहिती दिली तर पैसे मिळतील, या आशेने संबंधिताने फोन केल्याचे उघडकीस आले. पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याबद्दल नांदेड सिटी पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला. संतोष गायकवाड ( वय ३२, रा. नांदेड गाव, पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

वैष्णवीचे ९ महिन्याचे बाळ आरोपी निलेश चव्हाणकडे असताना वैष्णवीचे आई-वडिल हे बाळ आणण्यासाठी त्याच्याकडे गेले होते. त्यावेळी त्याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हाकलून लावले होते. त्यावरून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून तो फरार आहे.

नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल बोस यांनी सांगितले की, पोलिस नियंत्रण कक्षाला बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फोन आला. फरार नीलेश चव्हाण याला पकडले आहे. त्याच्याकडे २ पिस्टल मिळाले आहेत. त्याला मारहाण करुन गाडीच्या डिकीत ठेवल्याचे फोनकर्त्याने सांगितले. तो कुठे आहे असे विचारल्यावर किरकटवाडी येथे असल्याचे सांगितले. लगेचच नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे पथक तेथे गेले. त्यांनी संतोष गायकवाड याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने पैशांची मागणी केली.

पैसे दिले की त्याची माहिती देतो, असे तो सांगत होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने कोणालाही पकडले नसून, पोलिस पैसे देतील, असे वाटल्याने फोन केल्याचे सांगितले. पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करुन खोटी माहिती दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×