Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

मुलींची छेड काढण्यावरुन महिलेने तरुणाच्या कानाचा घेतला चावा

डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना होस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरून हॉस्टेल चालकासह त्याच्या सुनेने तरुणाला बेदम मारहाण केली. महिलेने तरुणाच्या कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले आहेत.

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला – सविस्तर बातमी

मिलिंद वसंत कोठारी (४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) आणि सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर असून, सोमवारी (दि. २६ ) दुपारी ते जेवण करुन घराबाहेर मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स होस्टेल चालवणारे सुरेश विठ्ठल कांबळे व त्यांची सुन आले. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता असे म्हणून कोठारी यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत, असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केली.

त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी पुढील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×