Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात मद्यपी शिरला

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भारतीय जनता पक्षाचे खडकवासलाचे आमदार भीमराव तापकिर यांच्या घरात मद्यपीने शिरण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्याला अडवताच त्याने शिवीगाळ करत गोंधळ घातला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी शंकर सर्जेराव धुमाळ(४७) याला अटक केली आहे. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा, सार्वजनीक ठिकाणी शिवीगाळ , घरात घुसण्याचा प्रयत्न आदी चार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजित देवघरे यांनी तक्रार दिली आहे.

घरफोडी करणार्‍या ३ अल्पवयीनांना घेतले ताब्यात – सविस्तर बातमी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार , मद्यपी बुधवारी (दि. २८ ) रात्री आरोपी मद्यपान करुन आमदाराच्या घरापाशी आला. तेथील सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यांना धक्काबुक्की करत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत तो सध्या पुण्यात एकटाच राहायला असून, पुर्वी काचेचे ग्लास विक्री करत होता. होता. गावाकडे त्याची शेती आहे. दरम्यान वर्षभरापुर्वीही त्याने अशाच प्रकारे सुरक्षा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे उघड झाले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×