Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यात गांजा तस्करीसाठी कारचा वापर, दोघांना अटक

पुण्यात गांजा तस्करीसाठी कारचा वापर, दोघांना अटक

३५ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – कारमधून गांजा तस्करी करणार्‍या दोघा सराईतांना पुणे पोलिसांच्या युनीट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा, मोटार असा १४ लाख ८४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१ रा. बिल्डींग नंबर ११ फ्लॅट नंबर १०७, नविन म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) विशाल दत्तात्रय जाधव (वय २८ रा. हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात भाजप, काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी – सविस्तर बातमी 

शहरात अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक लोणी काळभोर परिसराच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी युनीट पाचने कदमवाक वस्ती परिसरात सापळा रचून सराईत अक्षय पाडुळे आणि विशाल जाधव यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या मोटारीतून ३४ किलो ४४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपींनी एकमेकांना संपर्क करण्यासाठी वापरलेले मोबाईलही ताब्यात घेण्यात आले आहेत.

गांजा तस्कराी केल्याप्रकरणी संबंधित दोघांविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या इतर तीन साथीदारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आरोपी अक्षय पाडुळे हा साकीनाका पोलीस ठाण्यातंर्गत खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक संदीपान पवार, उपनिरीक्षक अभिजीत पवार, उपनिरीक्षक वैभव मगदुम, नासिर देशमुख, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, अकबर शेख, शशिकांत नाळे, सुभाष आव्हाड, किशोर दुसिंग, वैभव रणपिसे, उमाकांत स्वामी, स्वाती तुपे, अमर चव्हाण, शहाजी काळे,राहुल ढमढेरे अविनाश इंगळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×