Breking News
कारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यूकात्रज चौकात डंपरच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यूवैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापनफुकट गोवऱ्या-लाकडे दिल्याच्या रागातून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यावर सत्तूरने हल्लापंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुण्यात भाजप, काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी; दगडफेक, पत्रकारांसह कार्यकर्तेही जखमी

पुण्यात भाजप, काँग्रेसचे कार्यकर्त्यामध्ये तुंबळ हाणामारी; दगडफेक, पत्रकारांसह कार्यकर्तेही जखमी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त टिप्पणी

marathinews24.com

पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान याच्याशी तुलना केली आहे. त्याचे तीव्र पडसाद रविवारी (दि.१५) पुण्यात उमटले असून, भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर दगडफेक केल्यामुळे काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यासोबत दोन पत्रकारही जखमी झाले असून, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे काही वेळानंतर वादविवाद मिटला.

बुलेटराजा कारवाईच्या तडाख्यात – सविस्तर बातमी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान याच्याशी केल्यामुळे संपुर्ण राज्यभर वाद निर्माण झाला आहे. भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवील असून, पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात सपकाळविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी (दि. १५) सकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या विधानाविरोधात काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यांनी जवळपास दीड तास आंदोलन केल्यानंतर काँग्रेसचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अचानक दगडफेक केल्यामुळे महिला व पुरुष कार्यकर्ता जखमी झाला. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने दगडफेक केली. यामुळे एकच धावपळ उडाली. राड्यात घटनास्थळी उभ्या असणार्‍या काही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तसेच पत्रकार, महिला पोलिसाही जखमी झाले आहेत. घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला. दरम्यान, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने काँग्रेस भवनावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस भवनाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना अभय दिले. या घटनेत काही कारच्या काचाही फुटल्या आहेत. तसेच काँग्रेसची एक महिला कार्यकर्ती व कार्यकर्ताही जखमी झाला आहे. यावेळी काही पोलिसांनाही दगड लागलेत, असा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे.

महापौरांच्या उपस्थितीत दगडफेक – नगरसेवक प्रशांत जगताप

भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहा महिन्यांत दुसर्‍यांदा काँग्रेस भवनावर हल्ला केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत आज आमचा कार्यकर्ता व कार्यकर्ती जखमी झाली. महापौरांपुढे ही दगडफेक केली जात असताना त्या उघड्या डोळ्याने तमाशा पाहत होत्या. त्यांच्या समोर ही दगडफेक केली जात होती. त्यांच्या समोर या कार्यालयाच्या आवारातील गाड्या फोडण्यात येत होत्या. त्याला महापौरांनी मूक संमती दिली. त्यामुळे महापौर मंजुषा नागपुरे व भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केली आहे.

याप्रकरणी जे पोलिस दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. ज्यांनी हे आंदोलन करीत पुणेकरांना वेठीस धरले, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा किंवा जखमी होण्याकरिताचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पुणे पोलिसांनी फक्त तमाशा पाहिला असून, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी दोन तास रस्ता रोखून धरल्यानंतरही त्यांनी भाजपच्या लोकांवर कारवाई केली नाही. त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले, असेही जगताप म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×